Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

    ‘सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.’
१९ आणि २० डिसेंबर २०१६ - जयपूर, राजस्थान
१. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे साधिकेच्या मुलीच्या लग्नाला जाणे, तसेच देवदर्शनही करणे
     ‘१९ डिसेंबर या दिवशी आम्ही महर्षींनी सांगितल्याप्रमाणे राजस्थानमध्ये शिव आणि काळभैरव देवांचे दर्शनही घेतले. त्या वेळी आम्ही येथील एका साधिकेच्या मुलीचे लग्न निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना केली. महर्षींनी आम्हाला मुलीच्या लग्नाला जायला सांगितले होते. यामागचा कार्यकारणभाव सांगतांना महर्षि म्हणाले, ‘लग्नसमारंभात मोठा अपघात होण्याची शक्यता होती. या लग्नाला काही साधकही उपस्थित होते. त्यांच्याही जिवाला धोका होता. तो अपघात टाळण्यासाठी तुम्ही लग्नाला जाणे आणि देवाला प्रार्थना करणे आवश्यक आहे.’ महर्षींच्या आज्ञेप्रमाणे आम्ही लग्नाला गेलो होतो. हे लग्न निर्विघ्नपणे पार पडले. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी २० डिसेंबर या दिवशी लग्नासाठी आशीर्वादाचे नाडीवाचनही केले. यावरून आम्हाला महर्षींची प्रीती अनुभवायला मिळाली.
२. ‘गीतेचा प्रत्येक श्‍लोक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याशी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी मिळताजुळता !’ - सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन्
     ‘२० डिसेंबर या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् दूरध्वनीवरून म्हणाले, ‘‘गीतेचे ७०० श्‍लोक आहेत. यातील प्रत्येक श्‍लोक हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याशी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी मिळताजुळता आहे. त्यामुळे त्यांचे जीवन आदर्श आहे, अनुकरणीय आहे; म्हणून ते अनेक वर्षे लोकांच्या स्मरणात राहील.’’
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ
महर्षींची शिकवण आणि कार्य !

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn