Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !
श्री संत सोपानदेव समाधीदिन
---------------
थोर समाजसेवक गाडगेबाबा पुण्यस्मरण
---------------
संताजी जगनाडे महाराज पुण्यातिथी

आतंकवादी मेहदी बिस्वास याच्या ट्विटर खात्याचे मराठवाड्यात १ सहस्र समर्थक !

दारापर्यंत येऊन ठेपलेला आतंकवाद निपटण्यासाठी आता 
शिवसेना-भाजप शासनाने धडक कृती करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
     संभाजीनगर - बेंगळुरूहून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (आयएस्आयएस्) या आतंकवादी संघटनेचे ट्विटर खाते चालवणार्‍या मेहदी मसरूर बिस्वास याचे संभाजीनगरसह मराठवाडा, मालेगाव आणि जवळच्या काही शहरांत सुमारे १ सहस्र अनुयायी (फॉलोअर्स) असल्याची माहिती समोर आली आहे. रॉ या गुप्तचर यंत्रणेने आतंकवादविरोधी पथक आणि पोलीस यांनी सतर्कतेची चेतावणी दिली आहे. अजून कोणालाही कह्यात घेतलेले नाही. लवकरच काही जणांची चौकशी होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. (हीच गोष्ट जर एखाद्या हिंदूच्या संदर्भात घडली असती, तर आतापर्यंत अनेक हिंदूंना पकडून कारागृहात डांबण्यात आले असते आणि त्यांचा पोलिसांनी छळ केला असता. या प्रकरणात सर्व धर्मांध असल्यानेच त्यांची चौकशी करायला पोलीस विलंब करत आहेत, असा संशय आल्यास त्यात चूक ते काय ? अशा पोलिसांना निलंबित करा ! - संपादक)

माघ मेळ्यावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवणार

हिंदुबहूल भारतात हिंदूंचे उत्सव आतंकवादाच्या 
सावटाखाली साजरे करावे लागणे लज्जास्पद ! 
     प्रयाग - सिडनी आणि पेशावर येथे झालेल्या भीषण आतंकवादी आक्रमणांच्या पार्श्‍वभूमीवर शासनाकडून सुरक्षेच्या कारणास्तव प्रयाग येथील माघ मेळ्यावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. प्रयाग येथील संगम तिरावर ४ जानेवारीपासून माघ मेळ्यास आरंभ होत आहे. 

काँग्रेसप्रमाणे भाजपच्या राज्यातही समाजकंटक मोकाट !

  • सनातनच्या आश्रमात घुसून साधकांना मारहाण करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई न होण्याचा आजचा ६० वा दिवस !
  • सनातन आश्रम बंद करण्याची उघड धमकी देऊनही पोलिसांनी कारवाई न करण्याचा आजचा ३७ वा दिवस !
हिंदु राष्ट्रात समाजकंटकांवर त्वरित कठोर कारवाई करण्यात येईल !

विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरल्यास शाळांवर कारवाई ! - राज्यशासन

जनतेकडून राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जाण्यासाठी तिच्या 
मनात देशप्रेम निर्माण करणे, हीच कायमस्वरूपी उपाययोजना होय !
     मुंबई - राज्यात प्रजासत्ताकदिन, तसेच स्वातंत्र्यदिन साजरे केल्यानंतर अनेक शाळांच्या आवारात राष्ट्रध्वज फेकलेले आढळतात. ते प्लास्टिकचे असल्यास अनेक दिवस तिथेच पडून रहातात. राष्ट्राच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने हे गंभीर असल्याने यापुढे विद्यार्थ्यांकडून प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही, याची दक्षता शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व शैक्षणिक संस्थांनी घ्यावी. शाळेच्या आवारात असे ध्वज सापडल्यास त्यासाठी शाळेच्या व्यवस्थापनाला उत्तरदायी धरून कारवाई करण्यात येईल, असा आदेश राज्यशासनाने दिला आहे.

भ्रष्टाचारात महाराष्ट्रात पुणे शहर आणि महसूल विभाग अग्रस्थानी !

युती शासनाने अशा भ्रष्टाचार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, ही जनतेची अपेक्षा !
     मुंबई - राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२ डिसेंबर २०१४ पर्यंतच्या राज्यातील लाचखोरांना पकडल्याच्या संदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये पुणे शहरात सर्वाधिक लाचखोरांना पकडल्याची नोंद झाली आहे. त्याच वेळी नेहमीप्रमाणे महसूल विभाग भ्रष्टाचारात आघाडीवर असल्याचेही स्पष्ट झाले आहे. वर्ष २०१४ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ सहस्र २०२ प्रकरणी सापळा लावून १ सहस्र ६२८ जणांना पकडले आहे.

मेर्वी (जिल्हा रत्नागिरी) येथे सनातनच्या साधकांना ठार मारण्याची धमकी देणार्‍या १५ पोलिसांवर त्वरित कारवाई करा !

विधीमंडळ अधिवेशन २०१४
शिवसेनेचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
रामदास कदम यांच्याशी चर्चा करतांना श्री. अरविंद पानसरे
     नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) - रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथे सनातनच्या साधकांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणार्‍या पुणे येथील १५ पोलिसांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि पर्यावरणमंत्री श्री. रामदास कदम यांनी १८ डिसेंबर या दिवशी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे. (सनातनच्या साधकांचा नाहक छळ करणार्‍या पोलिसांवर कारवाईची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना तत्परतेने पाठवणारे शिवसेनेचे नेते आणि पर्यावरणमंत्री श्री. रामदास कदम यांचे सनातन संस्थेच्या वतीने आभार ! - संपादक)

केरळ राज्यात अरेबिक विश्‍वविद्यालय स्थापन होणार !

हिंदूंनो, केरळचे इस्लामीकरण रोखा !
     थिरुवनंतपुरम् (केरळ) - येथील काँग्रेसच्या युती शासनाने राज्यात आंतरराष्ट्रीय अरेबिक विश्‍वविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री पी.के. अब्दुल रब यांनी विधानसभेत केली. (मुसलमान मंत्री स्वधर्मीयांचे हित पहातात; मात्र हिंदू लोकप्रतिनिधी हिंदूंचे हित तर सोडाच, त्यांच्या समस्यांकडेही दुर्लक्ष करतात ! - संपादक) इंडियन युनियन मुस्लिम लीगचे आमदार अब्दुल रझाक यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना ते बोलत होते.
     अब्दुल रब पुढे म्हणाले, यासाठी उच्च शिक्षण मंडळाने शिफारस केली असून अर्थखाते विश्‍वविद्यालयाच्या स्थापनेसाठी उचित पावले उचलत आहे.

केवळ विवाहासाठी केलेले धर्मांतर अवैध ! - अलाहाबाद उच्च न्यायालय

     प्रयाग (अलाहाबाद) - केवळ विवाह करण्यासाठी केलेले धर्मांतर कायद्याने वैध ठरू शकत नाही, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यप्रकाश केसरवानी यांनी दिला. यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्या. केसरवानी यांनी हा निर्णय दिला.
     उत्तरप्रदेश राज्यातील ५ हिंदु तरुणींनी मुसलमान युवकांशी विवाह करण्यासाठी इस्लाम पंथ स्वीकारला होता. यानंतर या तरुणींच्या कुटुंबियांकडून मुसलमान युवकांना धमक्या देण्यात येत होत्या. त्यामुळे या सर्वांनी या कुटुंबियांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.

वाराणसी येथे झालेल्या शिवयागात योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी यज्ञकुंडात पूर्णाहुती दिल्यावर स्त्रीदेवतेने स्वयं प्रकट होऊन आहुती स्वीकारली !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी यज्ञकुंडात पूर्णाहुती
 दिल्यावर स्त्रीदेवता स्वयं प्रकट होऊन आहुती स्वीकारतांना
    १८.१२.२०१४ या दिवशी सनातनच्या वाराणसी येथील सेवाकेंद्रात योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या मार्गदर्शनानुसार शिवयाग करण्यात आला. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी यागात पूर्णाहुती दिली. त्या वेळी घेतलेल्या छायाचित्रात अग्नीज्वाळेत स्वयं स्त्रीदेवता प्रकट होऊन आहुती स्वीकारत आहे, असे स्पष्टपणे दिसले. 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या हस्ते वाराणसी येथील अंध विद्यालय आणि शिक्षण संस्था यांना दान

१. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या हस्ते दान 
स्वीकारतांना श्री हनुमानप्रसाद पोद्दार अंध विद्यालयाचे प्रतिनिधी

भ्रष्टाचाराच्या प्रकरणी छगन भुजबळ आणि कुटुंबीय यांची चौकशी करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

युती शासनाने भ्रष्टाचार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून 
त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, हीच जनतेची अपेक्षा !
     मुंबई - माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळातील ११ कंत्राटांमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि अपहार या प्रकरणी भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुबियांची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील (एम्ईटीमधील) पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने १८ डिसेंबरला दिले.

शासनाच्या अर्थसाहाय्याच्या लाभावरून महाराष्ट्र अंनिस आणि अखिल भारतीय अंनिस यांच्यात वाद

लोकहो, यावरून अंनिसवाल्यांना समाजहितापेक्षा 
स्वहिताचीच अधिक काळजी आहे, हे लक्षात घ्या ! 
     नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) - जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार-प्रसार या प्रबोधनाच्या कामात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ने बावचळून न जाता या कार्याची हानी करणारी नकारात्मक भूमिका सोडून द्यावी. त्यांनी सक्रीय सहभागी होऊन शासनाच्या निधीतूनही उत्तम काम करता येऊ शकते, याचा वस्तूपाठ घालून द्यावा, असे आवाहन प्रा. श्याम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एका वर्तमानपत्रातून केले आहे.

जामिनावर सुटलेला लखवी इस्लामाबाद पोलिसांच्या कह्यात

     इस्लामाबाद, १९ डिसेंबर - मुंबईवर झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार झकी-उर-रेहमान-लखवी याची जामिनावर सुटका होताच पोलिसांनी त्याला पुन्हा कह्यात घेतले. कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहोचू शकतो, या कलमाखाली त्याला अटक करण्यात आली.हिवाळी अधिवेशनाचा कालावधी २४ डिसेंबरपर्यंत वाढवला !

विधीमंडळ हिवाळी अधिवेशन २०१४
     नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) - पूर्वनियोजनानुसार १९ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजणार होते; मात्र शासकीय विधेयके, ठराव आणि विशेष करून विदर्भावरील चर्चा या प्रमुख कारणांसाठी अधिवेशनाचा कालावधी २४ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय संसदीय कार्य सल्लागार समितीच्या बैठकीत १८ डिसेंबरला घेण्यात आला. सदर ठराव संसदीय कार्यमंत्री श्री. गिरीश बापट यांनी दोन्ही सभागृहात मांडला. 

गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील मेर्वी (जिल्हा रत्नागिरी) प्रकरणात लक्ष घालणार !

     मुंबई - मेर्वी (रत्नागिरी) जिल्ह्यातील येथे सनातनच्या साधकांचा छळ झाल्याच्या प्रकरणात मी स्वतः लक्ष घालीन. तुम्ही काळजी करू नका, असे आश्‍वासन गृहराज्यमंत्री (शहर) डॉ. रणजित पाटील यांनी १९ डिसेंबरला हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. त्यांना त्यासंदर्भात सादर केलेल्या निवेदनाच्या वेळी ते बोलत होते.

नालासोपारा येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारानिमित्त आज विशाल वाहनफेरी !

फेरीचा मार्ग : दत्त मंदिर (आरंभ) - संयुक्त नगर - आचोले रोड (सांगता), नालासोपारा (पूर्व)
वेळ : दुपारी ४ वाजता 
संपर्क : ९००४००९३९६

अमरावती, ठाणे, पेण आणि धुळे येथे प्रशासनाला निवेदने

३१ डिसेंबरच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम !
     सध्या पाश्‍चात्य प्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे आपल्या देशातही गुढीपाडव्याऐवजी नववर्ष ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा वाढीस लागली आहे. या रात्री युवकांचे मद्यपान, अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी रात्रभर मोठ्या आवाजाचे फटाके उडवून प्रदूषण केले जाते, तसेच कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावून त्यांच्या तालावर अश्‍लील अंगविक्षेप करून नृत्य केले जाते. तरुणींची छेडछाड करण्याचे प्रकार होऊन एकूणच कायदा अन् सुव्यवस्था संदर्भात गंभीर स्थिती निर्माण होत आहे.

अनधिकृत मशिदीचे बांधकाम थांबवणे आणि ३१ डिसेंबर या दिवशी होणारे अपप्रकार रोखणे यांसाठी निवेदन सादर

नायब तहसीलदारांना निवेदन देतांना धर्माभिमानी 
     ठाणे - येथील मशिदींवर अनधिकृतपणे भोंगे लावले असून काही ठिकाणी मशिदींचे अनधिकृत बांधकामही चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत भोंगे काढण्याचे आदेश देऊनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे लोकांना भोंग्यांचा त्रास होत असून ध्वनीप्रदूषणातही वाढ झाली आहे.

एन्.सी.ई.आर्.टी.ने छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास शिकवलाच पाहिजे ! - पर्यावरणमंत्री रामदास कदम

हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाला आश्‍वासक उत्तर !
     मुंबई - केंद्रशासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (एन्.सी.ई.आर्.टी.च्या) इयत्ता ७ वी, १० वी आणि १२ वी च्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना खोटी माहिती देणे, राष्ट्रपुरुष अन् स्वातंत्र्यसेनानी यांचा अवमान करणे, भारतीय संस्कृतीविषयी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणे, या प्रकारांमुळे राष्ट्रप्रेमींमध्ये संताप पसरला आहे. या पुस्तकांत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ ६ ओळींत, तर मोगल आक्रमकांची माहिती ६० पानांत दिली आहे. सदर लिखाण त्वरित पालटण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने शिवसेनेचे पर्यावरणमंत्री श्री. रामदास कदम यांच्याकडे नुकतीच केली.

फलक प्रसिद्धीकरता

हा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने लिहावा.
हिंदूंनो, केरळची इस्लामिस्तानच्या दिशेने होणारी वाटचाल जाणा !
     केरळमधील काँग्रेसच्या युती शासनाने थिरुवनंतपुरम येथे आंतरराष्ट्रीय अरेबिक विश्‍वविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री पी.के. अब्दुल रब यांनी विधानसभेत केली.

हिंदु तेजा जाग रे !

Jago ! 
Keralaki Congress Sarkarne rajyame Arebic Vishwavidyalay kholneka nirnay liya !
Hinduo, Keralaka Islamikaran karneka Congresska shadyantra jano !
जागो ! 
केरलकी काँग्रेस सरकारने राज्यमें अरेबिक विश्‍वविद्यालय खोलनेका निर्णय लिया ! 
हिन्दुओ, केरलका इस्लामीकरण करनेका काँग्रेसका षड्यंत्र जानो !

पानवळ, बांदा येथे प.पू. भगवानदास महाराज आणि प.पू. रुक्मिणीमाता यांच्या समाधी मंदिरांच्या जीर्णोेद्धारानिमित्त विधी

 पानवळ, बांदा येथील श्रीराम मंदिरात प.पू. दास
महाराज हे सपत्नीक धार्मिक विधी करत असतांना
     बांदा, १९ डिसेंबर (वार्ता.) - सावंतवाडी तालुक्यातील पानवळ, बांदा येथील प.पू. दास महाराज यांच्या श्रीराम पंचायतन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य चालू आहे. याअंतर्गत येथील प.पू. भगवानदास महाराज आणि प.पू. रुक्मिणीमाता यांच्या समाधी मंदिरांचा जीर्णोद्धारही करण्यात येत आहे. १८ डिसेंबर या दिवशी या दोन्ही समाधी मंदिरांतील प.पू. भगवानदास महाराज आणि प.पू. रुक्मिणीमाता यांच्या मूर्तींचे विधीपूर्वक तत्त्वावतरण करण्यात आले. त्यानंतर समाधी मंदिरातून या मूर्तींचे उत्थापन करून त्या येथील श्रीराम मंदिरात ठेवण्यात आल्या. यानिमित्त झालेल्या विधींचे यजमानपद प.पू. दास महाराज यांनी सपत्नीक भूषवले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा-पानवळ-डेगवे पंचक्रोशीतील श्रीराम मंदिर !

     निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा-पानवळ-डेगवे पंचक्रोशीत वसले आहे एक छोटेसे; परंतु अत्यंत जागृत श्रीराम मंदिर ! या मंदिराची स्थापना वर्ष १९७२ मध्ये झाली. श्रीराम मंदिराची स्थापना होण्यामागील कार्यकारणभाव, म्हणजेच हे मंदिर उभे रहाण्यामागील इतिहास येथे देत आहोत. हा इतिहास या मंदिराची स्थापना करणारे प.पू. दास (रघुवीर) महाराज यांच्याच शब्दांत येथे मांडत आहोत.
माझे वडील प.पू. भगवानदास महाराज आणि त्यांचे गुरु 
प.पू. श्रीधरस्वामी महाराज यांच्या चरणी वंदन !
१. 'श्रीरामाचे पाय दुखत असल्याने त्याला बसवायला पाहिजे', 
असे प.पू. दास महाराज यांनी बालपणीच सांगणे
     मी ११ वर्षांचा असतांना खूप दंगामस्ती करायचो. एका झाडावरून दुसर्‍या झाडावर उड्या मारणे, इतरांच्या खोड्या काढणे आदी गोष्टी करायचो. ११ वर्षांचा असतांना मला न विचारता वर्ष १९५३ मध्ये वडिलांनी म्हणजेच प.पू. भगवानदास महाराजांनी मला सज्जनगडावर प.पू. श्रीधरस्वामींकडे नेले. तेथे त्यांनी स्वामींना विचारले, "स्वामी, हा मुलगा खूप दंगामस्ती करतो. शिक्षकांना मारतो. काय करावे ? 'रामाचे पाय दुखतात. रामाला बसवायला पाहिजे. राम उभा आहे', असे हा मुलगा म्हणतो, तर याला काय करायचे ?"

साधकांनो, निष्ठेला कुरतडत रहाणार्‍या काळजीला दूर करून आपल्या जीवनरथाचे रज्जू प.पू. गुरुदेवांच्या रूपातील श्रीकृष्णाच्या हाती सोपवा ! - प.पू. दास (रघुवीर) महाराज

प.पू. दास महाराज
१. व्यक्तीतील स्वयंसिद्ध आनंद काळजीच्या काजळीने झाकोळून जात असल्याने 'मी'पणा प.पू. गुरुदेवांना अर्पण करून साधकांनी निष्काळजी व्हावे ! : 'प.पू. गुरुदेवांना कर्तेपणा देऊन आपण काळजी करण्याचे अगदी सोडून द्यावे आणि सदैव समाधानी अन् आनंदाने रहावे. 'प्रत्येक कृतीमध्ये जे घडते, ते प.पू. गुरुदेव आपल्या हिताकरता घडवत आहेत आणि आपल्याकडून ज्या क्रिया होतात, त्या आपण करत नसून प.पू. गुरुदेवच करून घेत आहेत, असा भाव ठेवावा. असा भाव ठेवणे अवघड नाही; मात्र त्यासाठी कसून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

तांदुळाच्या पोत्यावरील चित्रातील श्री बालाजीचे विडंबन हिंदु जनजागृती समितीने रोखले !

     दावणगिरे (कर्नाटक) - येथील श्री 'बालाजी इंडस्ट्रीज राइस मिल' या आस्थापनाने त्याच्या तांदुळाच्या पोत्यावर श्री बालाजीचे चित्र छापून विडंबन केले होते. ही बाब लक्षात येताच हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुळ्या केंद्राचे समन्वयक श्री. बी. राम भट पटवर्धन यांनी या आस्थापनाला संपर्क करून पोत्यांवरील श्री बालाजीचे चित्र काढण्यासाठी मालक श्री. एम्. श्रीनिवास यांचे प्रबोधन केले. 
     या वेळी समितीचे श्री. भट यांनी सांगितलेल्या सूत्रांना श्री. श्रीनिवास यांनी सहमती दर्शवली. त्यानंतर त्यांनी तांदुळाच्या पोत्यावरील श्री बालाजीचे चित्र काढले. त्याविषयी श्री. बी. राम भट यांनी श्री. श्रीनिवास यांचे आभार मानले आहेत. (या यशाविषयी ईश्‍वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा ! - संपादक)

या अंदाजपत्रकात धर्मांधांना आणखी किती निधी देणार ? - पॅट्रियट फोरमचा अर्थमंत्र्यांना प्रश्‍न

     नवी देहली - येथील 'पॅट्रियट फोरम' या राष्ट्रप्रेमी संघटनेने वर्ष २०१५-१६ च्या अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात 'मुसलमानांना येत्या अंदाजपत्रकात आणखी किती निधी देणार आहात', असा प्रश्‍न विचारला आहे. 
या पत्रात म्हटले आहे,
१. ११ डिसेंबरच्या दैनिक 'दि एशियन एज'मध्ये आलेल्या लेखानुसार, केंद्रशासन मुसलमानांना साहाय्य करण्यासाठी १५ कलमी कार्यक्रम आखण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत मदरशांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. 

आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे आगमन झाल्याचे सूचक असणारे पू. सौरभ जोशी यांचे खळखळून आनंदाने हसणे !

साधकांच्या रक्षणासाठी धावून आलेल्या श्री भवानीदेवीच्या संदर्भात रामनाथी 
आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती 
१. पू. सौरभ जोशी अकस्मात् खळखळून हसणे, त्यांनी 
'आई' म्हणून हाक मारणे आणि 'स्थुलातून आनंदाची 
वार्ता कळल्यावर त्यांच्या हसण्याचे कारण 
लक्षात येईल', असा विचार करणे
     'मी प्रतिदिन सायंकाळी पू. सौरभ जोशी यांच्या सेवेत असते. २.११.२०१४ या दिवशी मी त्यांच्यासमवेत बसले होते. सायं. ७.३० ते रात्री ८.१५ या कालावधीत पू. दादा अकस्मात् पुष्कळ खळखळून हसत होते. त्याचे कारण मला कळत नव्हते. ते इतक्या आनंदाने खळखळून हसत होते की, त्यांचे पोट आणि छाती पुष्कळ उडत होती. मी त्यांना विचारले, "तुम्ही अकस्मात् का हसत आहात ? मलापण सांगा ना काय आनंदाची वार्ता घडली ती ! मीपण हसेन. मलाही तुमच्यासारखा खळखळून आनंद घेऊ द्या ना !"

पुणे येथील हिंदु धर्माभिमान्यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट

डावीकडून श्री. प्रवीण नाईक, श्री. रोहित वाळिंबे,
श्री. मंदारबुवा रामदासी, श्री. गौरव वर्मा, डॉ. अजित
जगताप, श्री. संतोष गोपाळ यांना दैनिक सनातन
प्रभात विषयी माहिती सांगतांना श्री. आनंद जाखोटिया
     रामनाथी - पुणे येथील हिंदु धर्माभिमान्यांनी शनिवार, १३ डिसेंबर या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन या संदर्भातील कार्याविषयी सविस्तर जाणून घेतले. ही माहिती सनातनचे श्री. प्रशांत कोयंडे, श्री. आनंद जाखोटिया, श्री. नीलेश चितळे आणि सौ. नंदिनी चितळे यांनी त्यांना दिली. या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त केलेले श्री समर्थ संप्रदायाचे श्री. मंदारबुवा रामदासी, त्यांचे सहकारी श्री. रोहित वाळिंबे, पतित पावन संघटनेचे पुणे शहर संघटक श्री. विजय गावडे, त्यांच्या पत्नी सौ. सुहासिनी गावडे, भारत स्वाभिमान संघटनेचे चिंचवड विभागप्रमुख निसर्गोपचारतज्ञ डॉ. अजित जगताप, शिवसेनेचे पुणे शहर संघटक (खडकवासला) श्री. संतोष गोपाळ, श्री. भाग्येश्‍वर रोडगे, त्यांच्या पत्नी सौ. गायत्री आणि मुलगा, ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मनोज महाजन, ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सुहृद गोडबोले, श्री. गौरव वर्मा, श्री. साईराज पवळे यांच्यासह अन्य २२ धर्माभिमानी उपस्थित होते. प्रस्तावित इंटरनेट वार्तापत्र हिंदु वार्ताविषयीही या वेळी या धर्माभिमान्यांना अवगत करण्यात आले.
नथुराम गोडसे यांनी भगवद्गीतेचे पालन केले ! - ठाकूर अजयसिंग सेगल, महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष

हिंदूंनो, नथुराम गोडसे यांनी मूठभर मुसलमानांपुढे गुडघे टेकून त्यांचे लांगूलचालन करण्यास हिंदूंना भाग पाडणार्‍या आणि कोट्यवधी हिंदूंना मूठभर असलेल्या मुजोर अन् क्रूर मुसलमानांच्या दावणीला बांधणारे मोहनदास गांधी यांची हत्या केली, हे वास्तव जाणून त्यांच्या समर्थनार्थ संघटित व्हा !
'एबीपी माझा' या वाहिनीवरील चर्चासत्रातून मान्यवरांपेक्षा सूत्रसंचालकाचाच हिंदुत्वविरोधी सूर
     मुंबई - नथुराम गोडसे यांनी गांधी यांना मारले, ते चांगले केले. तसे झाले नसते, तर या देशाची १० शकले झाली असती. श्रीकृष्णानेही गीतेत सांगितल्याप्रमाणे अधर्माला नष्ट केले होते. त्यामुळे गोडसे यांनी गीतेचे पालन केले. ते योग्यच आहे, असे वक्तव्य महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष ठाकूर अजयसिंग सेगल यांनी केले. (असे आहे; म्हणूनच हिंदूंना गांधी हत्या करणार्‍या नथुराम गोडसे यांचा अभिमान वाटतो ! गोडसे यांची भूमिका रोखठोकपणे मांडणारे सेगल यांचे अभिनंदन ! - संपादक) ११ डिसेंबर या दिवशी 'एबीपी माझा' या वाहिनीवरील झालेल्या 'देशात हिंदुत्ववादी शक्तींचा प्रादुर्भाव वाढत चाललाय ?' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, अभिनव भारत संघटनेच्या अध्यक्षा (नथुराम गोडसे यांचे भाऊ गोपाळ गोडसे यांच्या कन्या) श्रीमती हिमानी सावरकर, भाजपचे नेते मधू चव्हाण हेही चर्चासत्रात सहभागी झाले होते.

छत्तीसगडमधील ढोलकाल पर्वतावर १ सहस्र वर्षे प्राचीन गणेशमूर्ती सापडली !

     रायपूर - बस्तर जिल्ह्यातील ढोलकाल पर्वतावर १ सहस्र वर्षे प्राचीन गणेशमूर्ती सापडली असल्याचा दावा छत्तीसगड पुरातत्व आणि सांस्कृतिक विभागाने केला आहे. हा परिसर नक्षलवाद्यांचा मोठा अड्डा समाजाला जातो. 
१. नागवंशी साम्राज्याच्या काळातील सहा फूट उंचीची ही गणेशमूर्ती १० व्या शतकातील असून तिचा शोध वर्ष २०१२ मध्ये एका पत्रकाराला लागला. त्यानंतर पुरातत्व विभागाने एक समिती स्थापन करून पुढील संशोधन हाती घेतले.

गोवा राज्यात लोकायुक्तपद १४ मास रिक्त रहाण्यास उत्तरदायी असणार्‍यांना निलंबित करा !

     'गेले १४ महिने गोव्यातील लोकायुक्तपदी कोणाचीच नेमणूक शासनाने केलेली नाही. लोकायुक्त नसल्याने आतापर्यंत लोकायुक्तापुढे दाखल झालेल्या २२ तक्रारींची चौकशी प्रलंबित राहिली आहे, तसेच लोकायुक्ताकडे नवीन तक्रार देण्यास लोक येत नाहीत. सध्या आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याशेजारी असलेल्या लोकायुक्त कार्यालयात असलेल्या ९ कर्मचार्‍यांना गेले १४ महिने उपयुक्त कामाशिवाय शासकीय वेतन दिले जात आहे. या कर्मचार्‍यांवर आणि इतर कार्यालयीन खर्चासाठी शासन ३ ते ४ लक्ष रुपये विनाकारण खर्च करत आहे. यात निबंधक, लिपिक, ३ पोलीस, १ चालक आणि एक शिपाई यांचा समावेश आहे.' मानस सर्व देहशुद्धी : ईश्‍वरी चैतन्याने सर्व देह चैतन्यमय करण्यासाठी पू. राजेंद्र शिंदे यांनी दिलेली एक अभिनव उपायपद्धत !

 पू. राजेंद्र शिंदे
     काहीही न सुचणे, चिडचीड होणे, कोणतेही शारीरिक कारण नसतांनाही अकस्मात् गळल्यासारखे होणे, प्रचंड थकवा येणे इत्यादी अनुभव अनेकांना अल्प-अधिक प्रमाणात आलेले असतात. या सर्वांमुळे शरीर, मन आणि बुद्धी यांवर ताण येतो. यांसारख्या सर्वच समस्यांवर 'मानस सर्व देहशुद्धी' हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. हा उपाय प्रतिदिन एकदा अथवा दोनदा आपल्या वेळेनुसार करता येईल. यासाठी २० ते २५ मिनिटांचा कालावधी लागतो.
१. मानस सर्व देहशुद्धीचा अभिप्रेत असलेला अर्थ 
     'येथे 'सर्व देहशुद्धी' म्हणजे केवळ स्थूलदेहाची अर्थात् शरिराची शुद्धी', असे अभिप्रेत नसून 'स्थूलदेहाच्या समवेतच सूक्ष्मदेह, मनोदेह (मन), कारणदेह (बुद्धी) आणि महाकारणदेह (अहं) या सर्व देहांची शुद्धी', असे अभिप्रेत आहे. यावरून या 'सर्व देहशुद्धी'ची परिणामकारकताही स्पष्ट होते.

मनातील निरर्थक आणि नकारात्मक विचार घालवण्यासाठी करायच्या प्रार्थना !

१. मनात अकस्मात् येणार्‍या निरर्थक आणि नकारात्मक विचारांमागील कारण आध्यात्मिक असल्याने ते बुद्धीला न उमगणे : 'अकस्मात् आपल्या मनात कधी कधी अनावश्यक आणि निरर्थक विचार येतात. या विचारांमुळे मन अस्वस्थ होणे, नकारात्मकता येणे आणि निरुत्साह वाटणे यांसारख्या विविध त्रासांना सामोरे जावे लागते, तसेच त्यासाठी मनाची ऊर्जा वापरली गेल्याने थकवाही येतो. अकस्मात् येऊ लागलेल्या या विचारांमागील नेमके कारण हे आपल्या बुद्धीला उमगत नाही. हे कारण आध्यात्मिकही असू शकते. ते ओळखण्याचे एक लक्षण म्हणजे बाह्य परिस्थिती प्रतिकूल नसूनही मनात असे विचार येऊ लागणे, काही न सुचणे इत्यादी. या सर्व विचारांवरील एक परिणामकारक उपाय म्हणजे ईश्‍वराला प्रार्थना करणे.

'पू. राजेंद्र शिंदे यांच्या आवाजातील 'मानस सर्व देहशुद्धी' ध्वनीफीत ऐकल्याने आलेल्या अनुभूती

'पू. राजेंद्र शिंदेे यांच्या आवाजातील 'मानस सर्व देहशुद्धी' ध्वनीफीत ऐकण्याने स्थूल आणि सूक्ष्म देह यांची 
शुद्धी होणे आणि 'या संदर्भातील ध्वनीफीत ही देवाची एक अमूल्य भेेेट आहे', असे वाटणे 
     'कलियुगातील रज-तम वातावरणात 'स्थूल आणि सूक्ष्म देह यांची शुद्धी होण्यासाठी 'मानस सर्व देहशुद्धी 'ध्वनीफीत ऐकणे हे एक चांगले माध्यम आहे', असे वाटते. ध्वनीफीत ऐकतांना ती आपल्याला वर्तमान स्थितीत ठेवत असल्याने त्या त्या देहाची शुद्धी होते. त्यामुळे पायांपासून डोक्यापर्यंत स्थूलदेहाची, तसेच प्राणदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह यांची शुद्धी होत असल्याने पुष्कळ हलकेपणा जाणवतो. संपूर्ण देहातील काळी शक्ती (टीप) नष्ट झाल्याने आवरण न्यून झाल्याचे जाणवते; म्हणून 'प्रत्येक साधकाने ही ऐकणे आवश्यक आहे', असे वाटते.

साधकांनो, धर्मरथावरील ग्रंथप्रदर्शन लावतांना परिणामकारक प्रसार करून श्रीगुरूंचे चैतन्यदायी ग्रंथ समाजापर्यंत अधिकाधिक पोहोचवा !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
'सनातन संस्थेच्या वतीने विविध जिल्ह्यांमध्ये सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने आणि चैतन्यदायी ग्रंथ यांचे धर्मरथावरील प्रदर्शन लावण्यात येते. ग्रंथप्रदर्शनाची सेवा परिपूर्ण होण्यासाठी साधकांनी लक्षात घ्यावयाचे बारकावे पुढे देत आहे.
१. प्रदर्शनापूर्वी करावयाची सिद्धता
अ. प्रदर्शनाचे उद्घाटन स्थानिक प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते करावे आणि त्याचे प्रसिद्धीपत्रक ('प्रेसनोट') इतर वृत्तपत्रांना प्रसिद्धीसाठी द्यावे.
आ. स्थानिक नागरिक, हितचिंतक, धर्माभिमानी आदींची भेट घेऊन त्यांना प्रदर्शनाचा उद्देश समजावून सांगावा.
इ. आसपासच्या परिसरातील हिंदुत्ववादी संघटना, महिला बचत गट, युवक संघटना, शाळा, तसेच महाविद्यालये यांना संपर्क करून त्यांना ग्रंथप्रदर्शनाचे निमंत्रण द्यावे.
ई. ग्रंथप्रदर्शनाच्या आसपासच्या परिसरात मेगाफोनद्वारे उद्घोषणा करून त्याचा प्रसार करावा.
उ. ग्रंथप्रदर्शनाविषयीचा मजकूर फलकांवर लिहून ते फलक मंदिरे आणि गर्दीच्या ठिकाणी अगोदरपासून काही दिवस ठेवावेत.

शिवजयंती तिथीनुसारच साजरी करण्यात यावी !

शिवनेरी स्मारक समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
     पुणे, १९ डिसेंबर - शासनाच्या वतीने शिवजयंती तिथीनुसार साजरी करावी, अशा मागणीचे निवेदन शिवनेरी स्मारक समितीने मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. राज्यशासनाने पुढील वर्षातील सुट्ट्यांची सूची घोषित केली. त्यात १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती देण्यात आली आहे. १९८० पासून फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया या दिवशी किल्ले शिवनेरीवर तिथीनुसार श्री शिवजयंती साजरी होत आहे. या उत्सवाला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित रहायचे. आता युतीचे शासन आल्याने तिथीप्रमाणे उत्सव साजरा करण्याचे घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
     समितीच्या वतीने अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे यांनी श्री. फडणवीस यांना निवेदन दिले, तर त्यावर शिवनेरी स्मारक समितीचे संस्थापक सर्वश्री बिंदूमाधव जोशी, ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे प्रांताध्यक्ष दादा पासलकर यांच्या स्वाक्षर्या आहेत.

कुंभमेळ्याला देण्यात येणारे पाणी आरक्षणमुक्त करा ! - आमदार स्नेहलता कोल्हे

नागपूर - बिगर सिंचनाचे वाढते आरक्षण आणि लोकसंख्या यामुळे दिवसेंदिवस गोदावरी कालव्यांचे पाणी अल्प होत आहे. त्याचा फटका शेतकर्यांिना बसतोे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक येथे नव्या वर्षात होणार्याट कुंभमेळ्यासाठी गोदावरीच्या कालव्यांवर पाण्याचे आरक्षण ठेवू नये, अशी मागणी भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. (संपूर्ण राज्यात दुष्काळ असतांना गेल्यावर्षी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी धर्मांधांच्या तीन दिवसांच्या इज्तेमासाठी ३० लक्ष लिटर पाणी दिले होते. तेव्हा शेतकर्यांचे पाणी पळवले, अशी कोणतीही ओरड झाली नाही. मग हिंदूंच्या कुंभमेळ्याला पाणी दिले, तर त्यात चूक ते काय ? - संपादक)

साधकांनो, स्वतःच्या चुकांसाठी उत्तरदायी साधक आणि सहसाधक यांना ढाल बनवून, तसेच इतरांच्या प्रगतीचे कर्तेपण स्वतःकडे घेऊन श्रीगुरूंची अवकृपा ओढवून घेऊ नका !

    'एका जिल्ह्यातील जिल्हासेविकेमध्ये अहंची तीव्रता अधिक प्रमाणात असल्याने ती स्वतःच्या चुका संत, तसेच सहसाधक यांच्यावर ढकलत असे. यासंदर्भातील प्रसंग पुढे देत आहे.
१. साधिकेमधील तीव्र अहंभाव दर्शवणारे काही प्रसंग
१ अ. एका विषयासंदर्भात संपूर्ण माहिती न घेणारी आणि ती चूक संतांवर ढकलणारी साधिका ! : या जिल्हासेविकेने एका साधकासंदर्भातील काही प्रसंगांची निश्चिंती न करता त्याविषयीची अपूर्ण माहिती एका संतांना दिली आणि मनानेच त्यासंदर्भातील प्रबोधनात्मक चौकट बनवली. काही दिवसांनी ती चौकट दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झाल्यावर त्यातील काही वाक्ये चुकीची असल्याचे उत्तरदायी साधकांच्या लक्षात आले. त्याविषयी त्यांनी या साधिकेकडे विचारणा केल्यावर तिने मी संतांना विचारूनच चौकट बनवली आहे, असे स्पष्टीकरणात्मक उत्तर देऊन स्वतःची चूक संतांवर ढकलली.
१ आ. एका सेवेसाठी अतिरिक्त साधकांचे नियोजन स्वतः करूनही त्यासंदर्भातील चौकटीत ती चूक केंद्रसेवकांची म्हणून मांडणे : त्या जिल्ह्यात पार पडलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या एका सेवेसाठी या साधिकेने अभ्यासाअभावी ५० अतिरिक्त साधकांचे नियोजन केले. यासंदर्भात प्रसारसेवकांना समजल्यावर त्यांनी ती सेवा आवश्यक तेवढ्याच साधकसंख्येत करण्याची जाणीव करून दिली. त्यामुळे अतिरिक्त साधकांचा वेळ अन्य सेवा पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणता आला.
    त्यानंतर या साधिकेने प्रत्येक सेवेसाठी आवश्यक तेवढ्याच साधकसंख्येचे नियोजन करण्यासंदर्भात दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रबोधनात्मक चौकट दिली. त्या चौकटीमधून 'ती चूक या साधिकेची नसून संबंधित केंद्रसेवकांची आहे', असे स्पष्ट होत होते.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्दशी/अमावास्या (२१.१२.२०१४) सकाळी ९.१६
समाप्ती - पौष शुक्ल पक्ष प्रतिपदा (२२.१२.२०१४) सकाळी ७.०६
उद्या अमावास्या आहे.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनाची एकाग्रता
    मनाची एकाग्रता ही अशी शक्ती आहे की, जी प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करून देते
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

हरि ॐ तत्सत

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणावर प्रेम करीत नाही. प्रेम मला खेचते. मी प्रेमात फसेन म्हणून मी प्रेमात अडकलो.
भावार्थ : 'मी प्रेम कोणावर करीत नाही', यातील 'प्रेम' शब्द हा व्यावहारिक, मायेतील प्रेमासंबंधी आहे. 'प्रेम मला खेचते', यातील 'प्रेम' म्हणजे प्रीती, पारमार्थिक प्रेम. नामधारकाचे 'प्रेम मला खेचते', म्हणजे मला त्याच्याविषयी ओढ वाटते.
    'मी प्रेमात फसेन', यातील 'प्रेम' हा शब्द व्यावहारिक प्रेमासंबंधी आहे. म्हणून 'मी प्रेमात अडकलो', यातील 'प्रेमा'त हा शब्द प्रीती म्हणजे पारमार्थिक प्रेम या अर्थाने वापरला आहे. थोडक्यात व्यावहारिक प्रेमात फसू नये, म्हणून मी पारमार्थिक प्रेमात अडकलो आहे.  
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण')

भ्रष्टांचे राज्य !

       
महाराष्ट्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१४ च्या भ्रष्टाचाराच्या विरोधातील कृतींचा आढावा घोषित केला आहे. त्यानुसार पुण्यामध्ये सर्वाधिक म्हणजे २०३ प्रकरणांत २१६ जणांना, तर त्याखालोखाल नाशिकमध्ये २०५ प्रकरणांत २१० जणांना अटक केली. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ८० प्रकरणांत ९० जणांना पकडण्यात आले आहे. राज्यात २०१३ मध्ये १ सहस्र २०२ ठिकाणी सापळे रचून १ सहस्र ६२८ जणांवर कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ६३९ अधिक लोकांना पकडण्यात आले आणि ही वाढ ११३ टक्के इतकी आहे. आता या आकडेवारीवरून महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे प्रमाणही ११३ टक्के इतकेच वाढले आहे, असे म्हणता येणार नाही. भारतात दिवसेंदिवस भ्रष्टाचारामध्ये होणारी वाढ ही १५० ते १८० टक्के इतकी आहे, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. याला कारण म्हणजे भ्रष्टाचार करणारे प्रतिदिन भ्रष्टाचाराच्या नवनव्या क्लृप्त्या काढत असतात. कधी कार्यालयाबाहेरच्या टपरीवर पैसे ठेवायला सांगतात, त्रयस्थाला द्यायला सांगतात, तर कधी कार्यालयातील शिपायाकडे पैसे ठेवले जातात. त्यानंतर अशा प्रकरणांत कधीकधी शिपायाला जरी अटक झाली, तरी संबंधित अधिकार्या वर कारवाई होतांना दिसत नाही. हे झाले सामान्य लाचखोरांचे. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांची कंत्राटदारांसमवेत असलेली भ्रष्ट युती ही भ्रष्टाचाराची परिसीमा असून त्या ठिकाणी या सापळ्यांनी काम भागत नाही. भ्रष्टांनी त्यांच्या लेखाचीच (अकाऊंटची) अशी रचना केलेली असते की, विनासायास सदर रक्कम संबंधित भ्रष्टापर्यंत पोहोचते. परिणामी आज महाराष्ट्र सदन घोटाळा, कोळसा घोटाळा, आदर्श घोटाळा, चारा घोटाळा, हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा, सिंचन घोटाळा यांसारखे अनेक घोटाळे हे केवळ चर्चेत येतात; मात्र प्रत्यक्षात हाती काही लागत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर्.एम्. लोढा यांनी काही दिवसांपूर्वी नागपूर येथे आल्यानंतर केलेले विधान अत्यंत महत्त्वाचे आहे. ते म्हणाले होते, 'न्यायालयीन व्यवस्थेत ९० टक्के भ्रष्टाचार हा अधिवक्त्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागाने होतो'. ही स्थिती आज प्रत्येक क्षेत्रातच आहे; कारण जे यंत्रणेचे रक्षक असतात, त्यांचेच हात भ्रष्टाचाराने आज सर्वाधिक बरबटलेले आहेत. परिणामी आज देशात लोकशाही नांदते कि भ्रष्टाचारशाही नांदते, हा प्रश्नज पडतो.
भ्रष्टाचाराच्या आडून धर्मावर टीका नको !
    भ्रष्टाचाराचा महाराष्ट्रापुरता विचार करावयाचा झाल्यास पुण्याचा आणि नाशिकचा अग्रक्रम लागला आहे. त्यामुळे काहीजण पुण्याच्या 'विद्येचे माहेरघर' असण्यावर आणि नाशिकच्या 'धार्मिक नगरी' असण्यावरही आक्षेप घेत आहे. येथे लक्षात घेतले पाहिजे की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने किती ठिकाणी सापळे लावले आणि किती जणांना पकडले, याची ही आकडेवारी आहे. त्यावरून 'विद्येच्या माहेरघरात हीच विद्या दिली जाते का ?' किंवा 'धार्मिक नगरीचा धर्म भ्रष्ट झाला का ?', अशी टोकाची चर्चा करण्याचे कारण नाही. भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असतो. तो धार्मिकता बाळगणार्याने केला म्हणून अक्षम्य आणि अधार्मिकाने केला म्हणून क्षम्य, असे म्हणता येणार नाही. त्याच वेळी भ्रष्टाचार करणार्यां नी धर्माचा बुरखा पांघरला म्हणून धर्माला नावे ठेवण्याचा अधिकार कुणालाही नाही. एखादा आधुनिक वैद्य भोंदू निघाला म्हणून संपूर्ण वैद्यकशास्त्रच चूक असे कुणी म्हणत नाही. त्याचप्रमाणे एखाद्याने धार्मिक असूनही भ्रष्टाचार केल्यास त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा व्हायलाच हवी; मात्र हिंदु धर्मावर आगपाखड होता कामा नये.
भ्रष्टाचार संपवण्यासाठी...
    आज भ्रष्टाचाराला राजमान्यता मिळाली आहे. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनत असल्याने त्याला एका व्यवहाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अगदी आईही आज मुलाला सांगते, 'तू माझे एक काम केलेस, तर मी तुला अमुक रुपये देईन.' तेथून मुलाच्या जीवनात भ्रष्टाचार हा देवाणघेवाणीचा भाग बनतो आणि पुढे त्याच मुलाला मोठा भ्रष्टाचार करतांना कोणतीही खंत वाटत नाही. त्यामुळे आज भारताची स्थिती अशी आहे की, जनतेला भ्रष्टाचार हा गुन्हा आहे आणि भ्रष्टाचार्यांना शिक्षा होणे आवश्यक असते, इथपासून शिकवावे लागणार आहे. दुसरे म्हणजे आजच्या कायद्यात परिवर्तन करून भ्रष्टाचार्याांसह त्यांच्या कुटुंबियांनाही शिक्षेस पात्र ठरवण्यात आले पाहिजे; कारण भ्रष्टाचार्यााचे वेतन किती आहे, हे त्याच्या कुटुंबियांना माहीत असते. त्यापेक्षा अधिक रक्कम त्याने आणल्यास त्याविषयी या कुटुंबियांनी विचारले पाहिजे, अन्यथा ते या भ्रष्टाचाराचे मूकसंमतीदार ठरतील. महाभारतात 'जी शिक्षा भ्रष्टाचार्यानला केली जाते, तीच शिक्षा अशा मूकसंमतीदारालाही करावी', असे सांगितले आहे. भ्रष्टाचारावरील सर्वांत महत्त्वाची उपाययोजना म्हणजे आधी भ्रष्ट आणि घोटाळेबाज राज्यकर्त्यांना हटवले पाहिजे. जनतेने गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या घोटाळेबहाद्दरांना हटवले, असे असले तरी अद्याप भ्रष्टाचाराचे प्रमाण अल्प झाले, अशी कोणतीही माहिती हाती आलेली नाही. त्याच वेळी निवडणुकांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप झाल्याचे पुढे आले आहे. परिणामी लोकशाही हा भ्रष्टाचार रोखण्यास असमर्थ असल्याचे आजवर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भ्रष्टाचार्यां चा देश अशी भारताची बनलेली प्रतिमा पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn